प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचं एकत्रितरित्या ६५ टक्के काम पुर्ण झालं आहे. तर या मार्गाचं उर्वरीत काम ३१ डिसेंबरपर्यंत पुर्ण करण्याचं सध्या नियोजन आहे. मेट्रोचं सर्व काम पुर्ण झाल्यानंतर केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या मार्गाची पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे परिचालन आणि यंत्रणा संचालक विनोद कुमार अग्रवाल यांनी दिली आहे.
पुणे मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीमधील प्राधान्यमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२१ अखेर हे दोन्ही मार्ग सुरू करण्यापूर्वी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पाहणी झाल्यानंतर हे दोन्ही मार्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती विनोद कुमार आग्रवाल यांनी दिली आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पात सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर, पावसाचे पाणी साठवण, बायोडायजेस्टर, वृक्षारोपण, झाडांचे पुनः रोपण आणि हरित इमारती हे काही उल्लेखनीय उपक्रमांचा समावेश आहे. पुणे मेट्रोच्या मार्गिकेत येणारे एकही झाड पुणे मेट्रोने तोडलेले नाही. मेट्रोने आतापर्यंत २ हजार २६१ झाडांचे पुनर्रोपण पूर्ण केले आहे. तसेच, विविध ठिकाणी १५ हजारांहून अधिक नवीन झाडे लावली आहेत. प्रत्यारोपणानंतर ८०% टक्क्यांहून अधिक झाडे जगली असल्याची माहिती मेट्रो कडून देण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत महामेट्रोने गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने काम पूर्ण केले असल्याचे यावेळी अग्रवाल यांनी सांगितले. पुण्यातील कात्रज ते निगडी आणि वनाज ते रामवाडी हे दोन्ही मुख्य मार्ग असून या दोन्ही मार्गांचे एकत्रितपणे सुमारे ६५% टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
*जाहिरात ब बातम्यांसाठी संपर्क 9975071717*