प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी चिंचवड,वाल्हेकरवाडी येथे जेतवन बौद्ध विहार ऑल इंडिया पँन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या हस्ते बोधीवृक्षारोपण समारोह सोहळा संपन्न झाला.
जेतवन बौद्ध विहार वाल्हेकरवाडी येथे ऑल इंडिया पँन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी वाल्हेकर वाडी येथील बौद्धविहाराला भेट दिली असता ,यांच्या हस्ते बोधिवृक्षचे रोपण करण्यात आले.दिपक भाई केदार हे आंबेडकरी चळवळीतील एक कणखर व निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे .
यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले आंबेडकरी जनतेवर होणारे अन्याय कधी खपवून घेतले जाणार नाहीत, ऑल इंडिया पँन्थर सेना ही समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे, बौद्धांच्या लेण्यांना कुठेही कुलुप किंवा दरवाजे नाहीत सर्व बौद्ध विहार समाजासाठी कायम उघडे ठेवण्यात यावीत. या वेळी तात्यासाहेब शिंगारे, उद्योजक जाधव साहेब , अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
जेतवन बौध्दविहार चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्षा विद्यात जाधव पासोटे यांनी सर्व मान्यवरांनी चे आभार व्यक्त केले. या वेळेस कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप,सामाजिक नेते बाबासाहेब जगताप,तात्यासाहेब शिनगारे,उद्योजक,जाधव साहेब,रामभाऊ खंडागळे,
ओबीसी संघर्ष सेनेचे पिं.चिं. शहराध्यक्ष वैजनाथ भाऊ शिरसाट,बाळासाहेब शेंडगे महाराष्ट्र संघटक तथा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना , जितेश जगताप महाराष्ट्र सरचिटणीस तथा पुणे जिल्हा अध्यक्ष,
अजय गायकवाड महाराष्ट्र कर्याद्यक्ष,उत्तम गायकवाड महाराष्ट्र सदस्य,किशोर काशीकर पुणे जिल्हा युवक अध्यक्ष,अनिल गायकवाड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष,शिवाजी गायकवाड कामगार अध्यक्ष,संतोष शेंडगे पिंपरी चिंचवड शहर कामगार अध्यक्ष ,हर्षवर्धन कांबळे पुणे जिल्हा चिटणीस,तुषार गायकवाड ,किरण गायकवाड,आदित्य शेंडगे चिंचवड विधानसभा अध्यक्ष,रंजना ताई सोनवणे,धम्मभूमी एज्युकेशन,सोसायटीच्या अध्यक्षा,बाबासाहेब गायकवाड,जया गायकवाड ,महिला उपाध्यक्षा बसपा भैय्यासाहेब ठोकळ,रज्जाक भाई शेख ,समर्थ जाधव,प्रेम जाधव, संध्या पासोटे,विक्की भाऊ पासोटे,गीता गाडे,बबीता मोरे,अॅड. नेहा कांबळे,अॅड. राजू दिवार ,सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भाई सिंग ,पत्रकार इमरान शेख प्रज्वल सोनवणे, अजिंक्य शेळके,हर्षल डोंबे,राहुल मदने कोशाध्यक्ष पिं.चिं.शहर बसपा आदी उपस्थित होते.
*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*