राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना फसविले भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना फसविले असून एसटी कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांसोबत आता सरकारशी संघर्ष करण्यासाठी भाजप राज्यभर संघर्ष चालूच ठेवेल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी दिला,

तर कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.आमदार लक्ष्मण जगताप यांनी वल्लभनगर एसटी आगाराला भेट देऊन संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा व्यक्त केला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याचे आश्वासित केले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांना हक्काचा पगार वेळेवर मिळत नाही. महाविकास आघाडीचे निष्क्रिय सरकार असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला. या प्रसंगी एसटी कर्मचाऱ्यांच्या शहीद बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ ‘बहुजन हिताय’ या भावनेने तुटपुंज्या पगारात जनतेची सेवा करताना कौटुंबिक समस्यांची पर्वा केली नाही. महामंडळाच्या बेपर्वाईमुळे वेळेवर पगारदेखील मिळत नसताना सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आहे. काही कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या आगारांमध्येच आपले जीवन संपविले. मात्र, ठाकरे सरकारने त्याची साधी दखलही घेतली नाही”.

”उलट संप संपविण्यासाठी आता पोलिसी बळाचाही वापर करून दडपशाही सुरू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे. कोरोनासारख्या संकटकाळात जिवावर उदार होऊन एसटी कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या सेवेची राज्य सरकारने उपेक्षा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव करून देणारे ठाकरे सरकार, कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पगार मात्र वेळेवर देत नाही” असा आरोप लांडगे यांनी केला.


*जाहीरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post