प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी : कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमधील अनेक मुलांचे आई-वडिलांचे छत्र हिरावले गेले आहे. अशा या अनाथ मुलांसोबत शहराच्या महापौर माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी दिवाळी साजरी केली.
कोरोनाने पालक हिरावलेल्या मुलांना आज आयुक्तांच्या दालनात बोलावून त्यांना फराळ देण्यात आला. तसेच आर्थिक मदतही करण्यात आली. या मुलांच्या शिक्षणासाठी उमेद जागर या उपक्रमातून सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार असल्याचे महापौर आणि आयुक्तांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उप आयुक्त अजय चारठाणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. आयुक्तांनी कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसमवेत दिवाळी फराळ उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्याकडे सोपवली होती. त्यानुसार त्यांनी नियोजन केले.
मिठाई व पणत्या वाटप केले. त्यांना भेटवस्तूही दिल्या. शहराची स्वछता ठेवणाऱ्या कामगारांची देखील दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हा उद्देश यामागे होता, असे नगरसेवक आणि मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले. यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, जामदार काका, प्रकाश काळे, गोवर्धन काळे, निगडी व्यापारी संघटनेचे रोहीदास शिवणेकर, तुकाराम काळभोर, रोहीत काळभोर , गणेशभाऊ आवघडे, नियाजभाई शेख आदी उपस्थित होते.
याच प्रभागातील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक उत्तम केंदळे दरवर्षी सफाई कामगारांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षीही प्रथा कायम राहीली. नगरसेवक उत्तम केंदळे स्पोर्ट्स क्लब व नगरसेवक उत्तम केंदळे युवा मंचच्या वतीने प्रभागातील सर्व साफसफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्मशानभूमीतील तसेच फवारणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप करण्यात आले. समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या सफाई कामगारांकडे समाज नेहमी दुर्लक्ष केले जाते. म्हणून नगरसेवक झाल्यापासून त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करत असल्याचे केंदळे म्हणाले.