भारतीय संविधान आणि समाज’ या विषयावरील परिसंवाद
प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ‘भारतीय संविधान आणि समाज’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, मौलाना अलिम अन्सारी, मौलाना अब्दुल गफ्फार, भिक्खुनी डॉ. सुमना, डॉ. सामनेरी उपलवना या परिसंवादात सहभागी झाले होते.
भारतीय संविधान आणि वारकरी संप्रदाय यांचे एकमेकांशी असलेले नाते यावेळी हभप अजय महाराज यांनी विशद केले. ते म्हणाले, मानवतेची मुल्ये संतांनी आपल्या शिकवणीतून जनसामान्यात रुजवली. या मूल्यांचे प्रतिबिंब संविधानात समाविष्ट आहेत.
मौलाना अलीम अन्सारी म्हणाले, भेदभाव आणि विषमतेला मूठमाती देऊन भारतीय संविधानाने समाजाला न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता बहाल केली. त्यामुळे या देशात सर्वधर्म एकत्रित नांदत आहेत. प्रत्येक धर्मातील नागरिक आज संविधानामुळे सुरक्षित आहे.
पुढे मौलाना आलीम अन्सारी म्हणालेअन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि लढण्याची ताकद संविधानाने दिली आहे. देश मजबूत ठेवण्यासाठी, देशातील सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी संविधानाची जपणूक करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. भारतीय संविधान भक्कम असल्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत .
परिसंवादाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाला महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांच्यासह सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सर्वजीत बनसोडे, देवेंद्र तायडे, आनंदा कुदळे, बापूसाहेब गायकवाड, भाऊसाहेब डोळस, राजेंद्र पवार, अॅड. विद्या शिंदे आदी उपस्थित होते.
*जाहिरात व बातम्यांसाठी साठी संपर्क अन्वरअली 9975071717*