भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात हजर.

 एकनाथ खडसे यांच्या सह त्यांची पत्नी आणि परिवाराची ईडी कडून चौकशी .



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनील पाटील : 

मुंबई - भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत.भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यांना कोर्टाकडून जरी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असला, तरी देखील त्यांनी दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावेत असे आदेश त्यांना न्यायालया कडून देण्यात आलेले आहेत. 

त्या नूसार मंदाकिनी खडसे या ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांची आज दिवसभर चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान याच प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीकडून एकनाथ खडसे यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली होती. या मध्ये लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.

गमावावे लागले मंत्रीपद....

एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना त्यांच्यावर पुण्यातील भोसरीमध्ये जमीन घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते. आरोप झाल्यानंतर खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. चौकशी निपक्षपातीपणे व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे खडसे यांनी त्यावेळी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मंत्रीपद गेल्याने खडसे हे पक्षावर नाराज होते, त्यांनी अनेकदा उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. परंतु खडसे यांची पक्षात योग्य ती दखल घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


इचलकरंजीतील  राजकिय घडामोडी  वाचा प्रेस मीडिया मध्ये..

जगदीश अंगडी. (कार्यकारी संपादक ) 

 

भोसरी जमीन घोटाळा.... काय आहे...?

फडणवीस सरकार मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. 

खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं. या प्रकणी आता एकनाथ खडसे यांच्या सह त्यांची पत्नी आणि परिवाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post