राज कुंद्रा, अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांच्यासह सहा जणांचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :. सुनिल पाटील :

मुंबई :  पोर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणी सायबर सेल पोलिसांनी नोंदवलेल्या गुह्यात अटक होऊ नये यासाठी न्यायालयात धाव घेतलेल्या राज कुंद्रा, अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांच्यासह सहा जणांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला.न्यायालयाने या सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने राज कुंद्रासह इतर काही जणांवर कुंद्रा यांच्यावर भादंवि आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. या गुह्यांत अटक होऊ नये म्हणून आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी झाली. आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नाही तसेच आपल्या विरोधात पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत असा दावा कुंद्रा यांचे वकील अॅड. शिरीष गुप्ते यांनी केला होता. तर सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी कुंद्रा याचा दावा फेटाळून लावत त्याला दिलासा देऊ नये अशी विनंती न्यायालयाला केली होती. या प्रकरणी राखून ठेवलेला निकाल न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी आज जाहीर केला.

Post a Comment

Previous Post Next Post