डोके शांत ठेवायचे असेल तर रजनीगंधा पानसुपारी खा...मंत्री जितेंद्र आव्हाड.

 आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तृळात उलट सूलट चर्चा रंगल्या आहेत.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनिल पाटील :

मुंबई - राज्याच्या जनतेने डोके शांत ठेवण्यासाठी रजनीगंधा पानसुपारी खाण्याचा अजब सल्ला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना आव्हाड यांनी डोके शांत ठेवायचे असेल तर रजनीगंधा पानसुपारी खा, असा वादग्रस्त सल्ला उपस्थितांना दिला आहे.

आव्हाड म्हणाले,'मी मुस्लीम बांधवांना तुम्हाला मी विनंती करतो की,डोके गरम करून घेऊ नये त्यांनी शांत राहावे विरोधक तुमची डोके भडकवयाची आहेत. म्हणून तुम्ही डोके शांत ठेवा. तुम्हाला विरोधक भडकवतील त्यात त्यांचा मोठा राजकीय स्वार्थ आहे. मात्र तुम्ही शांत रहा. तुम्हाला सांगतो, डोके थंड ठेवण्यासाठी मांस कमी खा, आणि तोंडात रजनीगंधा, गुटखा, पानमसाला हवे ते ठेवा, मात्र शांत रहा असा सल्ला आव्हाड यांनी दिला आहे. त्यांनी केलेल्या आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तृळात उलट सूलट चर्चा रंगल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post