भाऊबीजेला मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भेट म्हणून घरगुती गॅस सिलिंडर मागणार... खासदार सुप्रिया सुळे

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सुनिल पाटील : 

देशात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आता भाऊबीजेला मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भेट म्हणून घरगुती गॅस सिलिंडर मागणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


दिवाळीपूर्वीच पेट्रोल, डिझेलच्या दरात भरसाट वाढ झाली आहे. घरगुती गॅसची टाकी नऊशे रुपयांच्या पुढे गेली असून हॉटेल, रेस्टॉरंटला पुरवल्या जाणाऱया गॅस सिलिंडरच्या किमतीत 266 रुपयांची वाढ झाल्याने टाकीची किंमत 1950 रुपयांवर गेली आहे. हे कोणालाच परवडणार नाही. त्यामुळेच येणाऱ्या भाऊबीजेला आम्ही आठ बहिणी आमच्या सहा भावांकडे प्रत्येकीला एक गॅस सिलिंडर भेट द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे घरगुती गॅसच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी आपण संसदेत करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post