पोलिस निरीक्षकासह तीन लोक जखमी .
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मिरज : येथील कुपवाड रस्त्यावरील व्दारकानगर परिसरातील मिलिंद ॲसिड कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे मोठी आग लागली. पोलिस निरीक्षकासह तीन लोक जखमी झाले आहेत.सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, अभिजीत पाटील, प्रवीण हुक्कीरे, सूरज पाटील यांनी आग लागलेल्या ठिकाणी तत्काळ धाव घेतली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,
मिलिंद बाबर यांच्या मिलिंद फॅक्टरीत स्फोट झाला. आवाज ऐकून अधिकारी नागरीक धावले. ॲसिडने स्फोट घेतला होता. या भागात नागरी वस्ती असल्याने भितीचे वातावरण पसरले. तीनशे किलो ॲसिड होते त्याने पेट घेतला. धुराचे लोट आकाशात पसरले. जाळ दिसू लागला. त्यामुळे एकच घबराट उडाली. परिसरातील नागरिक दूर पळाले. शेजारील घरातून गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्याचवेळी अग्निशमन यंत्रणा वेगाने आली आणि दोन्ही बाजूंनी पाण्याचा फवारा मारून आग विझवण्यात आली.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवलेले असताना अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना केल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवलेले असताना अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना केल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत कारवाई केली जाईल, असा इशारा अग्निशमन विभागाने दिला आहे.