लोणावळा पोलिसांची जबरदस्त कारवाई नऊ पुरुष व आठ महिलांना अटक

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

लोणावळा :कार्ला गावाच्या हद्दीमधील एमटीडीसी शेजारी एका बंगल्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज कारवाई  केली व ९ पुरुष व ८ महिलांणा ताब्यात घेतले आहे,सूत्रांकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे अश्लिल चाळे करताना आढळून आले आहेत,  तसेच त्यांच्याजवळील वाहने, फोन असा सुमारे ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी ही माहिती दिली.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्लागावचे हद्दीमध्ये एम.टी.डी.सी. जवळ, दुर्गा सोसायटीमधील तन्वी बंगल्यामध्ये ९ पुरुष व ८ महिला असे स्पीकरवर गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करून नाचत आहेत अशी माहिती मिळाली.त्यानंतर लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या पथकाने दोन पंचाच्या उपस्थितीमध्ये छापा टाकून सदर ठिकाणाहून ९ पुरुष व ८ महिलांना ताब्यात घेत अटक कारवाई केली.

खाजगी बंगल्यामध्ये विनापरवाना सदरचे गैरकृत्य करताना हे पुरुष व यांच्यासह ८ महिलांना  देखील  ताब्यात घेतले.सदर ठिकाणाहून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी ५ वाहने, स्पीकर असा एकूण किं. रु. ७४ लाख २७ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post