प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे याकरता दिनांक 26- 11 -2021 रोजी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती यांची कोल्हापूर खंडपीठ प्रश्नाबाबत पुढील दिशा काय याकरिता सभा आयोजित केली आहे . या अनुषंगाने नुकतीच कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कोल्हापूर येथे जिल्हा बार असोसिएशनची सभा पार पडली सदर सभेमध्ये कोल्हापूर बार असोसिएशन चे ज्येष्ठ विधिज्ञ व सन्माननीय सदस्य यांनी आपली प्रखर सूचना व मते मांडून खंडपीठ स्थापन करणे करिता प्रखरपणे आंदोलन करणे आवश्यक आहे तसेच सन्माननीय सदस्य व ज्येष्ठ विधिज्ञ माजी अध्यक्ष यांनी आपली मते व्यक्त करून सूचना केल्या त्या अनुक्रमे
1 चक्रीय उपोषण करणे, आमरण उपोषण करणे.
2 पुढील काही दिवसात तालुका जिल्ह्यांच्या ठिकाणी खंडपीठ मागणी बाबत मोर्चे काढून माननीय जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणे
3 कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे आज अखेर चे माजी अध्यक्ष यांनी खंडपीठ मागणी बाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणे.
4 सहा जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची भेट घेऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेणे.
5 माननीय पंतप्रधान व ग्रह मंत्री भारत सरकार यांची भेट घेणे.
6 खंडपीठ स्थापनेकरिता आरक्षित जागेबाबत महसूल मंत्र्यांची भेट घेणे.
7 खंडपीठ आंदोलन मागणी बाबत सर्वपक्षीय मिटिंग होणे गरजेचे आहे गरज पडल्यास सहा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी वकील बांधवांचा मेळावा घेणे
अशा विविध सूचना या सभेमध्ये सर्व विधिज्ञ यांच्यामार्फत मांडण्यात आल्या .यावेळी अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष एडवोकेट गिरीश खडके साहेब यांनी सर्व विधिज्ञ यांचे सूचनांचा आदर करून सदरच्या सूचना व मते दिनांक 26 11 2021 रोजी चे सहा जिल्ह्यातील खंडपीठ कृती समिती समोर मांडल्या जातील अशी ग्वाही दिली.
यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाचे सदस्य एडवोकेट विवेक घाटगे , बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे माजी सदस्य महादेवराव आडगुळे , माजी अध्यक्ष प्रकाश मोरे , संपतराव पवार, अशोक पाटील , रणजीत गावडे, अजित मोहिते तसेच आधी ज्येष्ठ विधिज्ञ कोमल राणे, राजेंद्र किंकर, धनंजय पठाडे ,राजेंद्र मंडलिक, गिरीश नाईक, समिउल्ला पाटील, सर्जेराव खोत, व्ही. आर. पाटील यावेळी कोल्हापूर जिल्हा बार चे ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी लोकल ऑडिटर संकेत सावर्डेकर महिला प्रतिनिधी तृप्ती नलवडे व कार्यकारणी विशाल फराकटे, सुशांत चेंडके, सम्राट शेळके, करणकुमार पाटील, अरुण शिंदे, शुभांगी नलवडे , वारणा सोनवणे, संदीप मालेकर ,विक्रम पाटील हजर होते.
सदर सभेचे सूत्रसंचालन सचिव विजयकुमार ताटेदेशमुख यांनी केले व आभार उपाध्यक्ष सुधीर चव्हाण यांनी केले.