मतदारांचे लक्ष माञ दराकडे ,त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून विजयाच्या गणितासाठी जुळवलेल्या आकडेवारीला धक्का लागू नये, यासाठी उमेदवारांनी मतदारांना सहलीला जाण्यासाठी तगादा लावला आहे.मतदारांचे मात्र दराकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
यापूर्वी प्रथम मतदारांना सहलीवर पाठविले जाते. त्यानंतर त्यांच्याशी उमेदवार अर्थपूर्ण बोलणी करत असतात. परंतु यावेळी उमेदवारांनी सहलीचे नियोजन केले असताना देखील मतदार सहलीस जाण्यास तयार नसल्याचे दिसते. सहलीवर पाठविल्यानंतर मतदारांचा विरोधी उमेदवाराशी संपर्क देखील होऊ शकत नाही. याशिवाय या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराने किती मतदारांना सहलीवर पाठविले, यावर या निवडणुकीत निकालाचा अंदाज येत असतो. त्यामुळे मतदारांना सहलीवर पाठविण्यासाठी उमेदवाराची घाई सुरू असते.
पाटील व महाडिक यांची लढत निश्चित झाल्यानंतर मतदारांना 'टोकन' देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार मतदारांना सहलीवर पाठविण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत. परंतु अद्याप अर्थपूर्ण बोलणी पूर्ण न झाल्यामुळे मतदार राजा सहलीसाठी तयार नाही. येत्या दोन दिवसांमध्ये टोकननंतरची रक्कम निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मतदार सहलीला रवाना होण्याची शक्यता आहे
.