प्रेस मीडिया वृत्तसेवा :
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील पाणीप्रश्नासह सर्व समस्या सोडविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. येथील रेणुका माता, मातंगी देवी आणि परशुराम मंदिराचा कलशारोहण, प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.मंदिरामध्ये नूतन मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या हस्ते झाला.
मंदिराच्या देणगीदारांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ''उचगावचा पाणीप्रश्न सोडविणार असून निगडेवाडीपासूनची पाण्याची पाईपलाईन लवकरच पूर्ण होईल. महामार्गाबाबतच्या सूचनांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्याचीही निर्गत करण्यास सांगतिले आहे.'' माजी सरपंच पैलवान मधुकर चव्हाण, दीपक रेडेकर, अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
सरपंच मालुताई काळे, माजी सरपंच गणेश काळे, उपसरपंच प्रदीप बागडी, जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, पंचायत समिती सदस्य सुनिल पोवार, बजरंग रणदिवे, दिनकर पोवार, कावजी कदम, महेश जाधव, किर्तीकुमार मसुटे, सतिश मुसळे, वैभव पाटील, बाळासाहेब मोरे, दिपक काळे, रमेश वाईंगडे, रवी काळे, सुरेश चव्हाण, राजू काळे, अनिल दळवी, विनायक जाधव, अशोक निगडे, गुरु माने, ग्रामसेवक अजितकुमार राणे आदिंसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.