कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 10 डिसेंबर ला मतदान, कार्यक्रम जाहीर...



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 10 डिसेंबर ला मतदान, कार्यक्रम जाहीर...महाराष्ट्रातल्या ८ विधानपरिषद जागांची मुदत संपत आली आहे. यापैकी ६ जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. या ६ विधानपरिषदेच्या जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर १४ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे.

 

या आमदारांची मुदत संपली

आमदार सतेज पाटील (कोल्हापूर), भाई जगताप, रामदास कदम (मुंबई), अमरिषभाई रसिकलाल पटेल (धुळे, नंदुरबार), गोपीकीसन राधाकिसन बिजोरिया (अकोला, बुलडाणा, वाशिम), प्रशांत प्रभाकर परिचारक (सोलापूर), अरूणकाका जगताप (अहमदनगर), व्यास गिरीषचंद्र बच्चाराज.

Post a Comment

Previous Post Next Post