त्या वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार एवढे मात्र नक्की .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर जिल्हा विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली  या मुळे कार्यकर्त्यांना  दिलासा मिळाला परंतु जे जे लोकप्रतिनिधी आपल्या पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या  खर्चा सह आपला आकडा सांगत होते त्यांची मात्र गोची झाली हे मात्र नक्की . त्या बिच्यार्याना कधी कोणी साधी पार्ले बिस्कीट दिली नव्हती त्या लोकांनी नेत्यांच्या गाठीभेटी वेळी त्यांच्या चहा पाण्याच्या अगोदर ताटा मध्ये काजू कतली ठेवून नेत्यांना आपल्याकडे किती लोकमत असेल ते दाखवून दिले. त्यांची पुढची दिशा नगरपालिका निवडणुकीची तयारी  म्हणावी लागेल ,परंतु सुजान नागरिक मतदार बंधू भगिनी हे सर्व ओळखून आहेत . विधापरिषदेच्या निवडणुका संपल्या असल्या तरी नगरपालिका आहे अजून त्या वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार एवढे मात्र नक्की .

Post a Comment

Previous Post Next Post