कळंबा कारागृहाबाहेर तयारी : ३० जणांवर गुन्हा दाखल
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कळंबा मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर सुटणाऱ्या आरोपीची शहरातून मिरवणूक काढण्यासाठी जमलेल्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर घोेषणाबाजी केली. जुना राजवाडा पोलीसांनी या प्रकरणी गुुरुवारी रात्री ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पुढील तपास करीत आहेत.
संशयीत किरण खटावकर (रा. उत्तरेश्वर पेठ), साईराज राकेश वाघ (वय २१ रा. बाबा जरगनगर), समर्थ सुनिल पवार (वय १९ रा. शुक्रवारी पेठ) यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल झाला.
मारहाणीतील गुन्हातील संशयीत आरोपी अवधूत खटावकर यांच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला कारागृहात ठेवले होते. गुरुवारी त्याला जामीन मंजूर झाला. सायंकाळी तो कारागृहातून बाहेर पडणार असल्याचे त्याची शहरातून मिरवणूक काढण्यासाठी किरण खटावकर, साईराज वाघ, समर्थ पवार असे ३० ते ४० समर्थक तरुण कारागृहाच्या बाहेर झाडाखाली थांबले होते. यावेळी ते जोरदार घोषणाबाजीही करीत होते.
हा प्रकार जुना राजवाडा पोलीसांना समजल्यावर पोलीसांनी धरपकड करून तिघांना ताब्यात घेतले. तर इतर पळून गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पाटील करीत आहेत.
ऊस तोड मजूर दाम्पत्यास मारहाण
कोल्हापूर : प्रतिनिधी
वडणगे येथील बाळासाहेब आवटे यांच्या शेतात ऊस तोडणी करीत असताना गंगाबाई कल्याण यादव (वय ३०) व पती कल्याण यादव या दोघांनी शिवीगाळ व काठीने मारहाण झाली. गुरुवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी ट्रक चालक व दराडे नावाचा तरुण अशा दोघांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हेड कॉन्स्टेबल जरळी तपास करीत आहेत.
-----