प्रेस मीडिया वृत्तसेवा :
खालापूर - प्रतिनिधी
साजगाव, होनाड, आत्करगाव ग्रामपंचायत मधील प्रसोल केमीकल, कमानी आँईल, जयसिंग अलाँईज, विनस वायर सारख्या कारखान्यामधुन पाणी परिसरातील नदी - नाले तसेच हवे मध्ये मागील अनेक वर्षापासुन प्रदुषण सोडले जात आहेत. तसेच त्यामुळे अनेकांची शेती नष्ट झाली आहे. आत्करगाव गावातील पाण्याची पातळी खराब होऊन रसायन मिश्रीत पाणी येत आहेत. साजगाव पंचक्रोशीतील तसेच परिसरात नेते, पुढारी यांची ठेकेदारी प्रदुषणकारी कारखान्यातुन चालत असल्यामुळेच त्या कंपन्याविरोधात ठेकेदार नेते आवाज उचलत नाही.
मात्र आत्करगाव ग्रामपंचायत मध्ये होवु घातलेली जी कंपनी अद्याप आलीच नाही. त्या कंपनीची जनसुनावणी येत्या १७ नोव्हेबरला आहे. त्यामध्ये शासनाने सादर केलेला कंपनीचा डेमो पाहुन आणि जी कंपनी प्रदुषण किंवा जैविक कचरा नष्ट करण्यासाठी आहे, त्या कंपनीबाबत अभ्यास न करताच ठेकेदारी करणारे नेते स्वार्थासाठी विरोध करत आहेत.
आत्करगाव ग्रामपंचायतमध्ये असलेली विनस वायर या कंपनीमुळे आत्करगाव परिसरातील जमीन रसायन मिश्रीत झालेली आहे. भुगर्भातील पाण्याची पातळीमध्ये रसायन आहे, ज्यामुळे बोयरवेल व विहीरीचे पाणी वापरता येत नाही. झाडांना फळे व फुले येत नाहीत, अश्या गावातील प्रदुषणकारी विनस वायर कंपनीमध्ये गावातील नेते पुढा-यांची ठेकेदारी चालते. आणि हेच पुढारी भविष्यात येऊ घातलेल्या एस एम एस कंपनीला केवळ स्वार्थापोटी विरोध करीत असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते नितीन तवले व नितीन पाटील तसेच ईतर ग्रामस्थांनी प्रसार माध्यमांशी मांडली.
भविष्यात येणा-या जैविक कचरा निवारण करणा-या एस एम एस कंपनीमुळे ग्रामस्थांना रोजगार व ग्रामपंचायतीला सुविधा भेटत असतील तर नक्कीच आम्ही कारखान्यांचे स्वागत करु आणि साजगाव पंचक्रोशीतील प्रदुषणकारी कंपन्याच्या विरोधात यापुढे लढाई चालुच ठेवु, असेही मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.