महागाई ,इंधन दरवाढ विरोधात काँग्रेस आक्रमक

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत सहभागी होत बैलगाडी चालवून इंधन दरवाढीचा निषेध केला.


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कराड :  पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे वाढते भाव आणि कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य नागरिकांची ढासळत चाललेली आर्थिक स्थिती यामुळे कराड तालुका काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात कराड शहरातून पदयात्रा काढली.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रॅलीत सहभागी होत बैलगाडी चालवून इंधन दरवाढीचा निषेध केला.

मोदी सरकारच्या काळात तब्बल 69 वेळा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. मोदी सरकारने केलेल्या भाववाढीचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशातील भाजप सरकारने जनतेची अवस्था केविलवाणी केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या सात वर्षांत देशातील गोरगरीब जनतेकडून इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली केली आहे. ही एक प्रकारे जनतेची लूटच आहे. मोदी सरकारच्या कार्यपध्दतीवर लोक नाराज असून त्यांच्या विरोधात वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल आल्यानंतर मोदी सरकार धास्तावले. त्यानंतर इंधन दरवाढ थोडी कमी केली आणि दुसरीकडे 30 नोव्हेंबर पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना बंद केली. गोरगरीब जनतेला महिन्याकाठी मिळणारे रेशनवरील धान्य बंद करुन सरकारने जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

देशातत मोठय़ा प्रमाणात कोरोना विरोधातील लसीकरण झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला असला तरी जगात आपला क्रमांक 144 वा आहे. याचाच अर्थ आपल्यापुढे अजून 143 राष्ट्र आहेत. ही बाब सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घ्यायला हवी. राज्यात विरोधकांनी सरकार पाडण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. तीन पक्षाच्या सरकारला दोन महिने झाले की पडेल, वर्षांनंतर पडेल, आज पडेल, उद्या पडेल अशी वल्गना, भाकिते भाजपकडून केले जात होते. मात्र, सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे यात कोणतीही शंका नाही. इंधन दरवाढीवरून केंद्रातील मोदी सरकार राजकारण करत असून यातून सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम चालू आहे. यासाठी सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचं काम काँग्रेस करत असून देशभर आंदोलने करून जनतेचा महागाई विरोधात आक्रोश मांडत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post