इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे:
पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर इस्लामपूर जवळ असणाऱ्या वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . त्याच्याकडून ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन पोलिसांनी हस्तगत केले आहे.
या कारवाईने खळबळ उडाली आहे. माकेटो जॉन झाकिया(२५,रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे संशयित तरुणआरोपींचे नाव आहे. झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस क्र. के. ए.- ५१ -ए. एफ. ६२९१ मधून मुंबई हुन बेंगलोरकडे अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . पोलिसांनी इस्लामपूर जवळील वाघवाडी फाटा येथे सापळा लावला होता . बसची झडती घेतली असता झाकिया त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थ व एक मोबाईल ही पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे यांनी वर्दी दिली.झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधि.१९८५ चे कलम १६,२१ नुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सपोनि साळुखे करीत आहेत.या बाबत हा तरुण कुठून आला व कुठे जाणार होता . व हे कोकेन कुठे देणार होता याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न इस्लामपूर पोलिसांचा सुरू आहे.