शहाजी गायकवाड शाखेचा २४ वा वर्धापन दिन संपन्न.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे :
जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री ना. जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शनाखालील राजारामबापू बँकेच्या महाराष्ट्रभर ४६ शाखा प्रगतीपथावर असून ग्रामीण भागातील कुरळप येथील राजारामबापू बँकेची शाखा आदर्शव्रत ठरत असल्याचे मत संचालक शहाजी गायकवाड यांनी व्यक्त केले .
वाळवा तालुक्यातील कुरळप येथील शाखेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख संचालक शहाजी गायकवाड बोलत होते. त्यावेळी गायकवाड पुढे म्हणाले बँकेच्या पेठ येथील प्रधान कार्यालयात दोन हजार तेवीस कोटी ठेवी असून तेराशे ८५ कोटी कर्ज पुरवठा केला आहे. तर कुरळप शाखेत ३५ कोटी ठेवी असून नऊ कोटीच्यावर कर्जपुरवठा केला आहे.
नामदार जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील अण्णा यांचे कुशल नेतृत्त्वखाली महाराष्ट्रभर ४६ शाखा कार्यरत असून कुरळप सारख्या ग्रामीण भागातील शाखेने ऊस उत्पादक सभासदांच्या सह सर्वसामान्यांचे हित जोपासत शाखेने गरुड भरारी घेतली आहे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी आर पाटील दादा यांनी या शाखेला जागा उपलब्ध करून दिल्याने शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहे. शाखेचे काम आदर्शव्रत असून शाखेत लॉकरची सोय उपलब्ध केले आहे.
या कार्यक्रमास बँकेचे संचालक प्रशांत पाटील, युवा नेते दीपक पाटील आप्पा, माजी पंचायत समिती सदस्य बाबुराव वायदंडे, शाखाधिकारी एम एन पटवेकर, पी टी पाटील, पंढरीनाथ हंडे यांचेसह कुरळप, ऐतवडे बुद्रुक, लाडेगाव, कुरळप, वशी, करंजवडे गावातील सभासद, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबुराव वायदंडे यांनी आभार मानले .
*फोटो ओळी*-कुरळप येथील राजारामबापू सहकारी बँकेच्या शाखा वर्धापन दिनानिमित्त बोलताना शहाजी गायकवाड, प्रशांत पाटील,दिपक पाटील व इतर.