आरोपी पोलीस हणमंत देवकर पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिला निलंबनाचा आदेश
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे
इस्लामपुरात तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करणारा विकृत पोलीस शिपाई हणमंत कृष्णा देवकर याचे आज मंगळवारी निलंबन झाले. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी निलंबनाचे आदेश काढला.
महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी
हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) याला सोमवारी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश असताना निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.
याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पीडित विद्यार्थ्यांच्या गर्लफ्रेंडशी शारीरिक संबंधास नकार दिल्याचा राग मनात धरून त्या विकृत पोलीस कर्मचाऱ्यांने ४ हजारांची खंडणी उकळत अनैसर्गिक अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. २७ ऑक्टोबरला पहाटे तीन वाजता पेट्रोलिंग करीत असताना पीडित मुलगा घरी जात असताना देवकर व एक पोलिस कर्मचारी यांनी त्यास अडवून तू एवढ्या रात्री काय करतो असे विचारले.पीडित मुलाने मैत्रीणीला भेटून आल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याची माहिती घेत त्याचा मोबाईल नंबर घेतला होता. व दुसऱ्या दिवशी हणमंत देवकर ने मोबाईल वरून फोन करून कॉलेजच्या गेटवर भेट असे सांगून भेटायला बोलावले. त्याच्या प्रेमप्रकरणावर धमकावून पैशाची मागणी केली होती. संबंधित मैत्रिणीच्या घरी सांगण्याबद्दल धमकावले.त्याला घाबरून पीडित मुलाने पोलीस हनुमंत देवकर याला चार हजार रुपये उसने घेऊन दिले. परंतु त्याने त्याचे समाधान झाले नाही. त्याने पीडितास तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे व तिला माझ्या सोबत शरीर संबंध करायला सांग असे सांगितले. ती मुलगी चांगली असून पिडीत मुलाने नंबर दयायला स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विकृत देवकरने संबधित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचा व्हीडीओ काढला. पुन्हा रविवारी त्याने फोन करून पिडीत मुलाला बोलावण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्याने धाडसाने पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या प्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल दिला होता. त्यानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली.