प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे :
खानापूर - आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी सादिक खाटीक यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्वीकृत संचालक करा . अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी कासार - अष्टेकर यांनी केली आहे .
राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे नेते ना . जयंतराव पाटील साहेब यांना खास पाठविलेल्या ईमेल - पत्राद्वारे केली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आय आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी पॅनेलने ना . जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली १७ जागा जिंकत सांगली जिल्हा म. सह . बॅकेवर पुन्हा सत्ता प्रस्थापित केली . तथापि खानापूर - आटपाडी तालुक्यातून आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील हे शिवसेनेचे दोघेच नेते जिल्हा बँकेवर संचालक झाल्याने या दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संचालक पदापासून दुर राहीली आहे . या पार्श्वभूमीवर सौ . अश्विनी कासार - अष्टेकर यांच्या पत्राला विशेष महत्व प्राप्त झाले आहे .
आटपाडीचे सर्वस्पर्शी, सर्वमान्य, सर्वप्रिय, सर्वोत्तम लढवय्ये, जिगरबाज, नेक ,जिंदादिल कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक सर्व परिचित आहेत . शेकडो माय - भगिनींचा सच्चा भैय्या - भाऊ म्हणून सादिक खाटीक सर्वदूर लोकप्रिय आहेत . जमीनीवर पाय स्थिर असलेल्या या गरीबाने कधीही उन्मत्तपणा न दाखविता भाग, भागातील माणसे, पशु - पक्षी, वृक्ष- वल्ली वगैरे निसर्ग सृष्टीवर निर्व्याज प्रेम केले . या सर्वांसाठी अविरत कष्टप्रद कार्य केले . गेली ३८ वर्षे न थकता हा आमचा भाऊ सर्वांसाठीच दिवस - रात्र कार्यरत राहीला आहे . हे आपण जाणताच आणि तितक्याच आत्मीयतेने आपण या गरीबावर दिलखुलास प्रेम करता हे ही सर्वश्रूत आहे . असे स्पष्ट करून सौ . अश्विनी कासार - अष्टेकर यांनी , सांगली जिल्ह्यामध्ये किमान १५००० हजार महिला आणि पुरुषांचे बचत गट आहेत . या बचत गटातील लाखभर भगिनी - बांधवांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सादिक खाटीक यांचा सारखा अभ्यासू, ध्येयवेडा, धडपड्या आणि प्रत्येकाप्रती आत्मीयता असणारा व्यक्ती जिल्हा बँकेच्या संचालक पदी आल्यास खरोखरच हजारो माय - भगिनी, बांधव ,युवक - युवती राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे शिलेदार झाल्याशिवाय राहणार नाहीत .
सादिक खाटीक यांना संचालक पदी संधी दिल्यास ते अन्य सर्व संचालकांनाही आनंद होईल असे नेत्रदीपक काम करून दाखवतील . अप्रत्यक्ष रित्या आटपाडी तालुक्याचा, खानापूर विधानसभा मतदार संघाचा आणि उपेक्षित, वंचित, मागास, अल्पसंख्याक समाजा बरोबर, बहुजन समाज आणि माता - भगिनींचा गौरव ठरेल अशी नेत्रदीपक कामगिरी करतील . आपण सादिकभाईना संचालक पदी संधी देऊन हा तरुणाईच्या उत्साहाने सळसळणारा आवाज जिल्ह्यात द्विगुणीत करावा अशी अपेक्षा ही सौ .अश्विनी अष्टेकर - कासार यांनी व्यक्त केली आहे .