यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिनी विविध उपक्रम साजरे


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इस्लामपूर : इकबाल पीरज़ादे :

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन व मतदार जागृती कार्यक्रम पार पडला. 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संस्थेचे संस्थापक खा.एस.डी. पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे प्रा.क्रांती कांबळे यांनी भारतीय संविधानाचे पार्श्वभूमी व महत्त्व विशद केले. प्रा.डॉ.जी.के. किर्दत यांनी युवकांना मतदानाचे लोकशाहीतील महत्त्व सांगून मतदार जागृती बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य डॉ.ए.एम.जाधव यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संविधानातील लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी वक्तृत्व व लेखन कला आत्मसात केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांना वाव द्यावा असे मत डॉ.ए.एम. जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद व बी.ए.,बी. कॉम वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. प्रा.अमोल चांदेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.प्राची कांबळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. परवीन महाब्री हिने सूत्रसंचालन केले. पी.एन.पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो ओळी:

वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थीनी समवेत प्राचार्य डाॅ. ए. एम. जाधव, प्रा डाॅ. कल्पना मोहिते, प्रा डाॅ, अशोक शिंदे प्रा. डाॅ. जी.के. किर्दत,प्रा डाॅ क्रांति कांबळे, प्रा. अमोल चांदेकर*

Post a Comment

Previous Post Next Post