काँग्रेस जिल्हाध्यक्षांना धक्का
प्रेस मीडिया वृत्तसेवा इस्लामपूर :
इकबाल पीरज़ादे
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीचा प्रभाव पाहायला मिळाला.विकास सोसायटी गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहकार विकास पॅनेलने सातपैकी सहा जागा जिंकत हुकुमत राखली, मात्र जतमध्ये काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. तेथे भाजप आणि राष्ट्रवादीची जुनी मैत्री काँग्रेसला भारी ठरली आहे.
यापूर्वी महाविकास आघाडीतून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक तर काँग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे आता एकूण संख्याबळात राष्ट्रवादीला सर्वाधिक ९ , काँग्रेस ५ , भाजप ४, शिवसेना ३ असे बालाबल बैकेत समोर आले आहे इथेही जयंतनक्षत्राची *यह अंदर की बात है* ही खेळी सफल झाल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक निकाल असा…
सोसायटी गटातून वाळवा तालुक्यातील बैकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील विजयी झाले, हाय व्होल्टेज ठरलेल्या आटपाडीत शिवसेनेचे तानाजी पाटील यांची बाजी मारली, येथे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पराभव झाला. कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजी मारली, तासगावमध्ये राष्ट्रवादीचे बी. एस. पाटील विजयी झाले आहेत. कडेगावमधून आमदार मोहनराव कदम पुन्हा जिल्हा बँकेत आले आहेत.
महिला राखीव गटातून काँग्रेसच्या श्रीमती जयश्री पाटील, राष्ट्रवादीच्या श्रीमती अनिता सगरे यांचा मोठा विजय झाला. इतर मागास प्रवर्गातून काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे यांचा सलग दुसऱ्यांदा विजयी झाले, राष्ट्रवादीचे मन्सूर खतीब यांनीहीओबीसी गटातून बाजी मारली आहे. पतसंस्था गटातून कॉंग्रेचे पृथ्वीराज देशमुख, तर भाजपचे राहुल महाडिक विजयी झाले. प्रक्रिया गटातून दिवंगत आर.आर.पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीचे सुरेश पाटील, इतर संस्था गटातून राष्ट्रवादीचे वैभव पाटील विजयी झाले. मजूर संस्था गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि सत्यजित देखमुख विजयी झाले.
चौखट:-
सांगली जिल्हा बँक निवडणूक : आमदार विक्रम सावंत पराभूत; राज्यमंत्री विश्वजित कदम यांना व जिल्हाध्यक्षांना धक्का , देशमुखांच्या वर्चस्वाला तानाजी पाटील यांचा हादरा
सविस्तर निकाल या प्रमाणे-
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल
विजयी उमेदवार
१)विशाल पाटील काँग्रेस/मिरज सोसायटी गट
२)आ.मोहनराव कदम काँग्रेस/कडेगाव सोसायटी गट
३)महेंद्र लाड काँग्रेस/पलूस सोसायटी गट (बिनविरोध)
४)जयश्री मदन पाटील काँग्रेस /महिला गट
५)अनिता सगरे राष्ट्रवादी/महिला गट
६)दिलीप पाटील राष्ट्रवादी/वाळवा सोसायटी गट
७)आ.मानसिंगराव नाईक राष्ट्रवादी/शिराळा सोसायटी गट (बिनविरोध)
८)बी एस पाटील राष्ट्रवादी/तासगाव सोसायटी गट
९)प्रकाश जमदाडे भाजपा/जत सोसायटी गट
१०)तानाजी पाटील शिवसेना/आटपाडी सोसायटी गट
११)आ.अनिलभाऊ बाबर शिवसेना/खानापूर सोसायटी गट (बिनविरोध)
१२)अजितराव घोरपडे शिवसेना/कवठेमहांकाळ सोसायटी गट
१३)वैभव शिंदे राष्ट्रवादी/पाणीसंस्था गट
१४)मन्सूर खतीब राष्ट्रवादी/ओबीसी गट
१५)बाळासाहेब होनमोरे राष्ट्रवादी /अनुसुचित जाती जमाती गट
१६)राजेंद्र उर्फ चिमण डांगे राष्ट्रवादी/भटक्या जमाती
१७)सुरेश पाटील राष्ट्रवादी/प्रक्रिया गट
१८)पृथ्वीराज पाटील काँग्रेस/पतसंस्था
१९)राहुल महाडिक भाजपा/पतसंस्था
२०)संग्रामसिह देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट
२१)सत्यजित देशमुख भाजपा/औद्योगिक प्रक्रिया गट