डीकेटीईच्या १११ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीमध्ये निवड विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी : 

इचलकरंजी शहरातील डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरींग विभागामध्ये कॅपजेमिनी कंपनीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्हयूवमध्ये संस्थेच्या सर्वाधिक १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाख ते साडे ७ लाख इतके भरघोस पॅकेज देण्यात आले आहे.त्यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

कॅपजेमिनी ही फ्रान्स स्थित जागतिक मानांकीत सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी असून जगभरात अनेक देशामध्ये कंपनीचे कॉर्पोरेट ऑफीस आहेत. भारतामध्ये पुणे येथील कार्यरत असणा-या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईच्या १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  या कॅम्पस इंटरव्हयुकरीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या.  अ‍ॅप्टीटयुट, टेक्निकल आणि एच.आर राउंड या सर्व फे-यांमध्ये डीकेटीईच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिध्द केली.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागातून- ५०, मेकॅनिकल विभागातून-१८, इलेक्ट्रॉनिक्स विभागातून-२१, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागातून-११, इलेक्ट्रीकल विभागातून-८, सिव्हील विभागातून-३ अशा एकूण १११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. डीकेटीई संस्थेमध्ये इंटरव्हयुच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळेच या तयारीचा विद्यार्थ्यांना

खूप उपयोग होत आहे.या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.या यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे , आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, सचिव डाँ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

सदर विद्यार्थ्यांना संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक डॉ. यु. जे. पाटील, प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ.डी.व्ही.कोदवडे, डॉ व्ही.आर.नाईक, डॉ.एस.ए.पाटील व सर्व विभागप्रमुख,सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post