प्रबोधन वाचनालयाची दिवाळी अंक योजना सुरू




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी ता.८, समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य रसिकांसाठी  ' दिवाळी अंक २०२१ 'ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा शुभारंभ अजीज शेडबाळे, जगन्नाथ पोवार, स्वाती कुलकर्णी, प्रमोद घालवाडकर,प्रा.श्याम माने,मोरेश्वर नाडगौड,प्रल्हाद मेटे,राजाराम पाटील,महंमद शेडबाळे,रेखा सौन्दत्तीकर यांच्यासह  रसिक वाचकांनी या योजनेचे सभासदत्व स्वीकारून केला

मराठी साहित्य व संस्कृतीचे पारंपारिक वैशिष्ठ व  भूषण असलेले उत्तमोत्तम स्वरूपाचे अनेक दिवाळी अंक या योजनेत वाचकांना उपलब्ध करून दिले आहेत.एकोणतीस हजार पुस्तके आणि शंभरावर नियतकालिके यांनी समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालयाच्या दिवाळी अंक योजनेचा आणि वाचनालयातील ग्रंथसंग्रहाचा लाभ इचलकरंजी व परिसरातील साहित्य रसिकांनी सभासद होऊन घ्यावा. त्यासाठी प्रबोधन वाचनालय,द्वारा.समाजवादी प्रबोधिनी, ५३६/१८ इंडस्ट्रियल इस्टेट ,शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे संपर्क साधावा. असे आवाहन प्रबोधन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post