राजर्षी शाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी भरमू मगदूम ; व्हाईस चेअरमनपदी बबन शिंदे



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

येथील काडापूरे तळ परिसरातील राजर्षी शाहू सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी भरमू मगदूम यांची तर व्हाईस चेअरमनपदी बबन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय कुंभोजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सदरची निवड घोषित करण्यात आली.

येथील काडापूरे तळ परिसरात असणाऱ्या राजर्षी शाहू सहकारी पतसंस्थेने पारदर्शी कारभार व सभासदांचे हित जोपासत संस्थेची यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. या संस्थेच्या नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी ज्येष्ठ संचालक दत्तात्रय कुंभोजे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली.यामध्ये चेअरमनपदी भरमू मगदूम यांची तर व्हाईस चेअरमनपदी बबन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नूतन पदाधिका-यांचा संचालक मंडळाच्या वतीने मान्यवरांनी सत्कार केला.या सत्काराला उत्तर देताना नूतन पदाधिकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने सभासदांचे हित जोपासत संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु ,अशी ग्वाही दिली.

या बैठकीस संस्थेचे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब शिंदे ,लहू माने ,आनंदा ढामणे ,आनंदा बोलके ,आनंदा निकम ,शिवाजी शिंदे ,बापूसो घोरपडे ,सौ.शेवंता शिंदे ,सौ.लैला मुजावर ,तज्ञ संचालक चिदानंद ज्वोले ,विश्वास तोडकर ,मोहन शिखरे ,महादेव शिंदे ,सेक्रेटरी सौ.बागेवाडीकर ,क्लार्क अवधूत शेंडे व सभासद उपस्थित होते.



कार्यकारी संपादक : जगदीश अंगडी 

Post a Comment

Previous Post Next Post