इचलकरंजी : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात जोरदार निदर्शने

 देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जोरदार निदर्शने करुन निषेध नोंदवण्यात आला


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शिवसेनेच्या वतीने शिवतीर्थ येथे अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जोरदार निदर्शने करुन निषेध नोंदवण्यात आला.तसेच तिच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन त्याचे दहन करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत हिने भारत देशाला भीक म्हणून स्वातंत्र्य मिळाल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.या वक्तव्याचे देशभरातील विविध ठिकाणी पडसाद उमटत आहेत. याच अनुषंगाने

आज रविवारी इचलकरंजी शहरात शिवसेनेच्या वतीने सकाळी शिवसेना शहर कार्यालयापासून मोर्चा काढून तो शिवतीर्थ याठिकाणी आणण्यात आला.या मोर्चामध्ये अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन तिच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला.तसेच शिवतीर्थ येथे अभिनेत्री कंगना राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत तिच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड व शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी आपल्या मनोगतात भारत सरकारने अभिनेत्री कंगना राणावत हिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा  अशी मागणी केली.

 यावेळी शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे,धनाजी मोरे यांनीही निषेध व्यक्त केला.या निदर्शनामध्ये माजी शहरप्रमुख महेश बोहरा, भरत शिवलिंगे, युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, उपशहरप्रमुख लक्ष्मण पाटील,अजयकुमार पाटील, बसय्या स्वामी,संजय पाटील,बाळासो मधाळे,दादा पारखे,,अपंग सेनेचे दिलीप शिंदे,नितीन कुगे,महिला आघाडीच्या मंगल मुसळे, शोभा गोरे,शोभा कोलप, मधूमती खराडे, सविता सपाटे, शबाना शेख, मंगल लायकर,युवासेनेचे अविनाश वासुदेव, ऋषी गौड ,सूरज लाड,मारुती बने, बापू जाधव,भारत पोवार,रवी धनगर,विनोद जुवे,अनिल जुवे,संदीप माने,मेहबूब मनेर,मधुकर पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक : 

Post a Comment

Previous Post Next Post