सांगलीत डीकेटीई तर्फेे प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम


विद्यार्थी - पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

बारावी शिक्षणानंतर इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेदरम्यान विदयार्थी व पालकांना प्रवेशप्रक्रियेतील टप्प्यांदरम्यान होणा-या चुका व गैरसमजुती कशा टाळाव्यात तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या मुददयांची सखोल माहिती देण्यासंदर्भात डीकेटीई अभियांत्रिकी काँलेज तर्फे सांगली मध्ये खरे मंगल कार्यालय हॉलमध्ये अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया नियमावली बनविणा-या तज्ञ मार्गदर्शक औरंगाबादच्या गर्व्हमेंट कॉलेजचे प्रा. डॉ. आर.व्ही. शेटकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इचलकरंजी शहरातील डीकेटीई अभियांत्रिकी काँलेजच्या वतीने सांगली येथे आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात प्रारंभी स्वागतपर मनोगता मध्ये कॉलेजचे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांनी महाविद्यालयाची ठळक वैशिष्टय सांगितली. यावेळी औरंगाबादच्या गर्व्हमेंट कॉलेज, औरंगाबादचे प्रा. डॉ. आर.व्ही.शेटकर यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान सेंटरवर पुरविल्या जाणा-या सुविधा व त्यांची कार्यपध्दती याची इत्यंभूत माहिती दिली तसेच खुल्या व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग विभागामध्ये प्रवेश मिळविण्याकरीता आवश्यक असलेल्या अटींची व निकषांची परिपूर्ण माहिती दिली.

 विविध फे-यांसाठी पर्यायी फॉर्म भरण्यासंदर्भात व त्या दरम्यान होणारी संभ्रमावस्था टाळण्यासाठी सविस्तर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. करिअर निवडीतील संभाव्य चुका टाळण्यासाठी जास्तीत जास्त विकल्पांची यादी पूर्णतः विचार करुन तयार ठेवण्याचे, प्रवेशातील टप्प्यांबद्दल इत्यंभुत माहिती एसएमएसद्वारे मिळविण्यासाठी योग्य पासवर्ड व मोबाईल नंबर नोंदविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी विद्यार्थी व पालकांच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंबंधीच्या सर्व शंकांचे निरसन केले. सदर कार्यक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आभार डे.डायरेक्टर डॉ.सौ.एल.एस.आडमुठे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन कानिटकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. व्ही.आर.नाईक, डॉ.डी.व्ही.कोदवडे, डॉ.एस.ए.पाटील डॉ. कंठे, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी, प्रा. एस.बी.अकिवाटे यांनी केले तसेच सदर कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.



कार्यकारी संपादक : जगदीश अंगडी 


Post a Comment

Previous Post Next Post