रुई : माने नगर येथील माळ भागाकडे रुई ग्राम पंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष..

 तक्रारी अर्जाला कचऱ्याची टोपली दाखवली जाते.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : मनु फरास : 

 इचलकरंजी  : रुई माने नगर या ठिकाणी रस्ते, स्ट्रीट लाईट गेली सहा महिन्यापासून बंद आहे . या बाबत तक्रार केली असून पण आज तागायत ना रस्त्यावरची लाईट लागली आहे ना गटरी साफ झाल्या आहेत.

रस्त्याकडेला गाजर गवत उगवलेले गटारी स्वच्छ केल्या नसले मुळे साथिचे रोग पसरत आहेत,नागरी सुविधाचा आक्षरशा वानवा या ठिकाणी दिसत आहे,एकिकडे केंद्र सरकार स्वच्छ भारत अभियान राबत आहे आणि माने नगर रुई येथे घानिचे सामराज्य पसरले आहे, खरोखरच इतक्या अस्वच्छ वातावरणातही नागरीक रहातात कसे..? हा मोठा प्रश्न आहे. या बाबत बैतुल माल कमेटीचे अध्यक्ष आल्लाऊदीन बाबा,व त्यांचे सर्व सदस्य वांरवार तक्रार देत आसतात पण त्यांच्या तक्रारीला कचऱ्याची टोपली दाखवली जाते.

Post a Comment

Previous Post Next Post