इचलकरंजीत माधव विद्या मंदिरच्या इमारतीचा शुक्रवारी लोकार्पण सोहळा

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील सेवाभारती संचलित श्री माधव विद्या मंदिरच्या नव्या इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भैय्याजी तथा सुरेश जोशी यांच्या हस्ते व सेवा भारती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.या सोहळ्याची सविस्तर माहिती सेवाभारतीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या संख्येने कामगारांचे कुटुंब परगावाहून वास्तव्यास आले आहेत.त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची गरज ओळखून सेवा भारतीने शिक्षण क्षेत्रातही सेवा करावी, असा प्रस्ताव पुढे आला. यातूनच स्वयंसेवकांच्या मदतीने २००२ साली श्री माधव विद्या मंदिर या नावाने शाळा सुरू केली. कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटावा, या हेतूने सुरू केलेल्या या शाळेत सध्या बालवाडी ते दहावी पर्यंतचे शिक्षण अत्यल्प शुल्कमध्ये दिले जाते. विनाअनुदानित असलेल्या या शाळेत सुमारे ४३० विद्यार्थी शिकत असून त्यांच्यात ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करणे, महापुरुषांच्या विशेषत्वाचे दर्शन घडवणे, आदींसह चांगले संस्कार केले जात आहेत.परिणामी ,

या शाळेकडे विद्यार्थी व पालकांचा ओढा वाढला असून नव्या वर्गाची गरज ओळखून नवीन प्रशस्त इमारत उभी केली आहे. यासाठी सुमारे १कोटी २० लाखांचा खर्च झाला असून देणगीदारांच्या वर्गणीतून हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शैक्षणिक सेवा प्रकल्प सुरू आहे. शाळेचे भव्य पटांगण आहे. नव्याने बांधलेल्या तीन मजली इमारतीचा उदघाटन व लोकार्पण सोहळा येत्या शुक्रवारी दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्टेशन रोडवरील कमानीजवळील शैक्षणिक संकुलामध्ये

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य भैय्याजी तथा सुरेश जोशी यांच्या हस्ते व सेवा भारती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सेवा भारतीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.तसेच या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या पत्रकार बैठकीस डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश पवार, सेवाभारतीचे कार्यवाह प्रमोद मिराशी, प्रकल्प संचालक नरोत्तम लाटा, अरविंद कुलकर्णी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग धोंडपुडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post