इचलकरंजी : क्राईम न्यूज :. चोघांचा समावेश असलेल्या गिलबिले या गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली


आणखी काही गुन्हेगारी टोळ्या व पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रडारवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या  रेकॉर्डवरील प्रकाश पांडुरंग गिलबिले याच्या सह निलेश बाळासो पाटील , पवन शंकर नाईक आणि योगेश विठ्ठल मुरूमकर या चोघांचा  समावेश असलेल्या गिलबिले या गुन्हेगारी टोळीवर पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. 

याबाबत शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दपारीच्या कारवाईच्या प्रस्तावाला जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक बाबुराव महामुनी यांनी दिली.

इचलकरंजी शहरातील गणेशनगर भागातील प्रकाश गिलबिले, निलेश पाटील, पवन नाईक व योगेश मुरूमकर या सराईत गुन्हेगारांवर खून, दरोडा, खंडणी, विनयभंग, गर्दी, मारामारी आदी विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे शहापूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्यांच्या कारवाया सुरूच असल्यामुळे शहापूर पोलिसांनी या चौघांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठविला होता. हद्दपारीच्या कारवाईला त्यांनी मंजुरी दिली आहे. गिलबिले याच्यासह त्याच्या तिघा साथीदारांना अटक करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई शहापूरचे पोलीस निरीक्षक श्रीप्रसाद यादव व त्यांच्या पथकाने केली. मागील सहा महिन्यात शहर व परिसरातील रेकॉर्डवरील 9 गुन्हेगारांसह दोन टोळ्यातील 9 जण अशा 18 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक महामुनी यांनी सांगितले.तसेच हद्दपारीच्या कारवाईसाठी

आणखी काही गुन्हेगारी टोळ्या व पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रडारवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post