मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या वैष्णवी कागले व पूर्वा शिरगांवे या दोन विद्यार्थीनींनी धावणे स्पर्धेत चांगले यश संपादन केले.या यशाबद्दल त्यांचे क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.नुकताच बेलवडे येथे झालेल्या 1600 मीटर धावणे स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थीनी वैष्णवी अमोल कागले हिने प्रथम क्रमांक तसेच चांदेकरवाडी येथे झालेल्या खुला गटातील 800 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.तसेच बेलवडे येथे झालेल्या खुल्या गटातील तीन किलो मीटर धावणे स्पर्धेत
कु.पूर्वा सुनील शिरगांवे या विद्यार्थिनीने चौथा क्रमांक आणि बोरगाव येथे झालेल्या पाच किलो मीटर धावणे स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक मिळवून ट्रॉफी व सन्मानपत्र मिळविले. या यशाबद्दल सदर दोन्ही विद्यार्थीनींचा श्री. ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा ,चेअरमन हरीष बोहरा , व्हाईस चेअरमन उदय लोखंडे , ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी बाबासाहेब वडींगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांसह श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस.गोंदकर , उपप्राचार्य आर. एस.पाटील , उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस.भस्मे व पर्यवेक्षक व्ही.एन. कांबळे यांनी अभिनंदन केले.या यशस्वी विद्यार्थीनींना
एस. एन . पवार, एम. आर. नाईक व क्रीडा विभाग प्रमुख शेखर शहा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.