डीकेटीई काँलेजमध्ये उच्च दर्जाच्या अग्निरोधक कापडाची निर्मिती

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी :

वस्त्रनगरीतील डीकेटीई अभियांत्रिकी काँलेजमधील टेक्स्टाईलच्याअंतिम वर्षातील विद्यार्थी  साकेत तोतला, सिध्दांत कटारीया, सिध्दांत गोडसे, कुश तिवारी, अनुराग झंवर आणि निरज राठी यांनी प्रा.डॉ.मंजुनाथ बुर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉटन फॅब्रिकपासून उच्च दर्जाचे अग्निरोधक कापड विकसित केले आहे.त्यामुळे या कापडाचा अग्निपासून संरक्षण होण्यासाठी चांगला उपयोग होणार आहे. या संशोधनाबद्दल सदर विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून मोठे कौतुक होत आहे.

भारत देशात बहुतांश प्रमाणात अग्निरोधक कापड युरोपिय देशामधून आयात केले जाते. तसेच याला पर्याय म्हणून व देशातील नागरिकांची सेवा करण्याच्या उत्कट भावनेने संरक्षणात्मक कापड करण्यास त्यांना प्रवृत्त केले.

सध्या अगीच्या घटना वाढत असल्याने अडचणीच्या ठिकाणी अग्निशामक गाडया वेळेत पोहचू शकत नाही.यामुळे वेळ वाया जावून जिवीतहानी बरोबरच वित्तहानीच्या घटना वाढत आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन डीकेटीई काँलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात उपयुक्त अशा अग्निरोधक कापडाची निर्मिती केली आहे. या कापडाची निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व मटेरियल हे इचलकरंजीमध्ये एअरजेट व रॅपिअर लूम्सवरती निर्माण होणा-या ग्रे कॉटन कापडापासून बनविले आहे. सदर अग्निरोधक कापड बनविताना ग्रे कॉटन हे १८० जीएसएम प्रतीचे वापरण्यात आले. तसेच अग्निरोधक कापडासाठी लागणारे फिनीश हे गुजरात मधील नामांकीत टेक्नीकल टेक्स्टाईल कंपनीमधून करण्यात आले.विद्यार्थ्यांनी अग्निरोधक कापडापासून जॅकेट बनवून युरोप येथे बनविलेल्या जॅकेटचा तुलनात्मक अभ्यास केला तर सदर जॅकेट हे पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला.    

शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि एआयसीटीई व्दारे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२०  या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये त्यांनी ही कल्पना सादर केली. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही वर्षातून एकदा होणारी स्पर्धा स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी निधी प्रदान करते.  या स्पर्धेत संपूर्ण देशातून एकूण २० हजार पेक्षा जास्त प्रवेशिका होत्या या स्पर्धेमध्ये सर्व फेरी पात्र होवून सध्या ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळविला आहे.  

सदर विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, प्रा. डॉ एम.वाय.गुडियावर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post