व्यापाऱ्यांना दंडाचा आदेश रद्द करण्याची इनाम व्यापारी असोसिएशनची प्रांतांकडे मागणी

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २७ नोव्हेंबर रोजी नविन आदेश काढले आहेत.त्यानुसार मास्क नसलेला ग्राहक दुकानात आढळल्यास दुकानदारांना १० हजार रुपये दंडाचा उल्लेख आहे. सदर आदेश राज्य सरकारने तातडीने रद्द करावा या मागणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच प्रणित व्यापारी असोसिएशनतर्फे प्रांत कार्यालयात नायब तहसलीदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या पावणे दोन वर्षांपासून व्यापारी अडचणीत आहेत,लॉकडाऊनमुळे अनेक व्यापाऱ्यांना आपले उद्योग धंदे बंद करावे लागले आहेत.या सर्व गोष्टी शासनाला ज्ञात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वानी मास्क घातला पाहिजे यासाठी आम्ही जरूर काळजी घेऊ,प्रबोधनही करू परंतू व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा का ग्राहकांचे मास्क तपासत बसावे , अनावधानाने विनामास्क ग्राहक सापडल्यास त्याची शिक्षा व्यापाऱ्यांना म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आहे.हे व्यापाऱ्यांवर जुलमी व अन्यायी परिपत्रक सरकारने तातडीने रद्द करावे.कोणीही व्यापारी अशा प्रकारचा दंड भरणार नाहीत ,असा पवित्रा इचलकरंजीत व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पोलिसांकडून जबरदस्तीने दंड वसूल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला सामूहिकरित्या प्रतिकार केला जाईल ,असेही व्यापाऱ्यांनी आज मंगळवारी प्रांत कार्यालयात निवेदन देताना नायब तहसिलदार संजय काटकर यांच्याशी बोलताना सांगितले.प्रशासकीय पातळीवर शासनापर्यत व्यापाऱ्यांचे म्हणणे पोहोचवावे व परिपत्रक रद्द करावे अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी इनामप्रणित व्यापारी असोसिएशनचे शितल मगदुम,मधुकर पाटील,राम आडकी, रमेश पवार,संजय डाके,सुरेश जमदाडे,उदयसिंह निंबाळकर,विकास चौगुले,अमोल ढवळे,दिपक पंडित,अतुल निटवे,महेंद्र जाधव,अभिजित पटवा व व्यापारी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post