विजेत्या खेळाडूंचे सर्वस्तरातून अभिनंदन.
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 18 वर्षाखालील खेलो इंडिया मुलींच्या कबड्डी स्पर्धेत इचलकरंजीच्या गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकावले.या स्पर्धेतील विजेत्या संघाचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 18 वर्षाखालील खेलो इंडिया मुलींच्या कबड्डी स्पर्धा नुकताच कोल्हापूर येथे राव अकॅडमीमध्ये पार पडल्या. या मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या 12 संघांनी सहभाग घेतला होता .
अंतिम सामना इचलकरंजी व घोटवडे या संघामध्ये झाला . यामध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या संघाने चमकदार कामगिरी करत 15 गुणांनी प्रथम क्रमांक पटकावला . तसेच त्यांची सातारा विभागीय खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. या संघामध्ये ऋतुजा अवघडी, अनीषा निकम , निकिता सुतार ,ऐश्वर्या थोरवत , निकिता जाधव ,अनुराधा पाटील , नंदिनी पाटील , तृप्ती जंगम , आरती वळकुंजे , साबिया नदाफ , धनश्री पाटील , गायत्री डोंगळे या खेळाडूंचा समावेश होता
या स्पर्धेत पंच म्हणून शहाजान शेख ,बाळू बनगे ,रमजान देसाई ,कुबेर पाटील ,संभाजी गावडे, कमृद्दिन देसाई, मनोज मगदूम ,अजय सावंत ,राजेंद्र बनसोडे ,युवराज गावडे ,ऋषिकेश लोहार, संदीप पाटील यांनी काम पाहिले
या स्पर्धा पार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडीगिरी,छत्रपती पुरस्कार विजेत्या सौ. उमा भेंडीगिरी , कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह संभाजी पाटील ,प्रा. डॉ. बाबासाहेब उलपे, पुंडलिक जाधव ,प्रा. अण्णासाहेब गावडे ,जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सुनील चव्हाण ,बालाजी बडबडे ,सुधाकर जमादार , मानसिंग पाटील, हॉकीचे प्रशिक्षक उदय पवार तसेच जिल्ह्यातील कबड्डीपटूंनी अथक परिश्रम घेतले.खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणा-या खेळाडूंचे गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर ,क्रीडा शिक्षक शेखर शहा यांच्या सह सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.