डीकेटीईच्या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये निवड

 

  


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील डीकेटीई इन्स्टिटयूट मधील अंजली बच्चाव, शशांक शुक्ला, शुभानी शिंदे यांची सीजीएम गु्रप, दक्षिण आफ्रिका येथे व बसवराज मिठारी यांची स्टँडर्ड कारपेट, दुबई येथील कंपनीमध्ये निवड झाली आहे. डीकेटीईचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठं, कंपन्यांशी असलेल्या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी शिकत असतानाच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेत त्यांना नोकरीची संधीही प्राप्त होत आहे.   

सीजीएम गु्रप ही आंतरराष्ट्रीय दक्षिण खंडातील सर्वात मोठा डेनिम उत्पादक आहे. कंपनीत कटींग आणि शिवणकामाबरोबरच वेट आणि ड्राय प्रोसेसिंग, एम्ब्रॉयडरी, वेस्ट वॉटर प्रक्रिया, रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट फॅसिलिटी इत्यादी सुविधा आहेत. स्टॅडर्ड कारपेट ही दुबईतील कारपेट तयार करणारी नामांकीत कंपनी आहे. कंपनीमध्ये वैविध्यपूर्ण कारपेटस तसेच कृत्रिम ग्रास उत्पादन घेतले जाते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठवण्यामागे डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे.  यावर्षी कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन माध्यमाव्दारे ट्रेनिंग देण्याचे कार्य पूर्ण केले.

डीकेटीई इन्स्टिटयूट मधील अंजली बच्चाव, शशांक शुक्ला, शुभानी शिंदे यांची सीजीएम गु्रप, दक्षिण आफ्रिका येथे व बसवराज मिठारी यांची स्टँडर्ड कारपेट, दुबई येथील कंपनीमध्ये निवड झाली आहे.डिकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये

व्दितीय वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी स्पर्धा आणि सॉफ्ट स्कील उपक्रम राबवला जातो. विद्यार्थ्यांची प्रि-प्लेसमेंट टेस्टव्दारे इंटरव्हयूची तयारीही करुन घेतली जाते. डीकेटीईच्या प्राध्यापकांची अनुभव संपन्नता अद्ययावत मशिनरी, सुसज्ज प्रयोगशाळा, अधुनिक ग्रंथालय याच बरोबर ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. संजय अकिवाटे यांच्या परिश्रमामुळे टेक्स्टाईल विभागाचे 100 टक्के प्लेसमेंट होत आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ.पी.व्ही. कडोले, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.





जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :

जाहिरात बातम्यांसाठी संपर्क : +919960646084







Post a Comment

Previous Post Next Post