प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील डिकेटीईच्या टेक्स्टाईल विभागात शिक्षण घेणा-या १५ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अरविंद लिमिटेड, अहमदाबाद कंपनीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी अरविंद लिमिटेड, अहमदाबाद येथे विविध पदांवर लवकरच रुजू होणार आहेत.
अहमदाबादमधील अरविंद कंपनी ही डीकेटीई संस्थेच्या स्थापनेपासून विद्यार्थ्यांना प्रत्येकवर्षी कॅम्पस इंटरव्हूव मार्फत निवड करीत आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वाँलिटी प्लेसमेंट व्हावे यासाठी डिकेटीईमार्फत ऑनलाईन इंटरव्हयूचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे.
अरविंद ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून कॉटन शर्टींग, डेनिम, नीट आणि बॉटमवेट (खाकी) फॅब्रिक बनविणारी कंपनी असून सदर कंपनी भारतातील डेनिम निर्मितीतील सर्वात मोठी कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी डिकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट देत असते. कोरानाच्या पार्श्वभुमीवर या वर्षी या कंपनीमार्फत ऑनलाईन कॅम्पस इंटरव्हयुव आयोजित केला होता त्यामध्ये रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमतांची चाचणी घेण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेवून त्यांची उत्तम पॅकेजसह निवड करण्यात आली. अरविंद लिमिटेड कंपनीमध्ये रुतीक साकाते, रितेश पोवार, तुशार कदम, सौरभ कडतारे, विशाल पाटील,क्षितीजा कांबळे, मोहित पिचा, सज्जेद पटेल, साहील नायकवडे, कृणाल भाटकुळकर, आयुशी नन्हे, सौरभ कांबळे, ओम पांढरे, गिरिश पवार व शिरीषकुमार देसाई या टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
डिकेटीईमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणारे सॉफ्टस्कील प्रोग्राम्स, देण्यात येणारे इंडस्ट्रीयल प्रशिक्षण, इंडस्ट्री भेटी, गेस्ट लेक्चर्स या सर्वांचा फायदा या विद्यार्थ्यांना होत असतो. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व सोयीनीयुक्त वर्कशॉप्स, लॅबोरेटरीज, उपलब्ध लायब्ररी सुविधा या सर्वांंमुळे हे विद्यार्थी यशाची शिखरे सर करतात. या सर्वामध्ये डिकेटीईचे ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा.एस.बी. अकीवाटे यांचा मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांना डिकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर डॉ.यु.जे. पाटील, डॉ एम.वाय. गुडियावर व प्राध्यापकांचे मागदर्शन लाभले.