इचलकरंजीतील चित्रपटगृहात 'जयभीम' चित्रपट प्रदर्शित करण्यास आदेश देण्याची मागणी

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी शहरातील चित्रपटगृहात सत्य घटनेवरील 'जयभीम' हा चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आदेश द्यावेत, या आशयाचे निवेदन आझाद समाज पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले. 

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहून भारतीयांना जगण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे. तरीही काही भ्रष्ट अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य माणसांवर अन्याय ,अत्याचार करत असतात. शासकीय यंत्रणेत प्रामाणिक कर्तव्य बजावणारे क्वचितच अधिकारी जन्माला येतात. दक्षिण भारतात १९९५ साली घडलेल्या घटनेत काही पोलीस अधिकाऱ्यांकडून एका कुटुंबावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम अँडव्होकेट चंद्र यांनी करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला आहे. ही कथा सांगणारा जयभीम चित्रपट शहरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यास समाजाला निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे सदर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आदेश द्यावेत ,अशा मागणीचे निवेदन आझाद समाज पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले. 

यावेळी सूर्यकांत देशमुख, सुनील देशमाने, रावसाहेब निर्मळे, रावसाहेब कांबळे, नागेश शेजाळे, प्रदीप कांबळे, गणेश निर्मळे, शहाजी भोसले, उमेश कांबळे, सचिन क्षीरसागर, पंकज माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post