इचलकरंजी शहरात कोव्हिड लसीकरण १०० % पुर्ण होण्या साठी कोव्हिड लसीकरण योजना राबविण्यात येणार .

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

इचलकरंजी :  शहरात कोव्हिड लसीकरण १०० % पुर्ण होण्या साठी  कोव्हिड लसीकरण  योजना राबविण्यात येणार 

 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना सर्व पात्र लाभार्थी नागरिकांचे १०० % लसीकरण होणे अपेक्षित आहे. याकरिता महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने *कोव्हिड लसीकरण  योजना* राबविणेत येणार आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने दि. २० नोव्हेंबरपर्यंत पात्र नागरिकांना पहिल्या डोसचे लसीकरण १००% पुर्ण करणे त्याचबरोबर दुसऱ्या डोसचे लसीकरण करणेत येणार आहे. 



सदर योजना यशस्वी होण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थां,तरुण मंडळ, महिला बचत गट यांच्या प्रतिनिधींचे सहकार्य घेणेच्या सुचना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने आज मंगळवार दि.९ नोव्हेंबररोजी मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी शहरातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था,तरुण मंडळ यांच्या प्रतिनिधी सोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहरातील शिल्लक राहिलेल्या पात्र लाभार्थी नागरिकांच्या मधील लसीकरण संदर्भातील भिती, गैरसमज तसेच आजारपण अशा प्रकारची कारणे आढळून येत असल्याचे निदर्शनास आल्याने सामाजिक- स्वयंसेवी संस्था,महिला बचत गटयांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन अशा नागरिकांचे मत परिवर्तन घडवून त्यांना लसी करणासाठी प्रवृत्त करणेकरिता सहकार्य घेणेबाबत सविस्तर चर्चा करणेत आली. 

याचबरोबर शहरातील कामगार, ऊसतोड मजूर, बेघर, फिरस्ते यांच्याशी संपर्क साधून त्यांचे कोव्हिड लसीकरण करणेत येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी समुपदेशनाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांची मदत घेण्यात येणार आहे.

   तरी इचलकरंजी शहरामध्ये  कोव्हिड लसीकरण  योजना यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी आपले बहुमोल सहकार्य करावे त्याचबरोबर ज्या नागरिकांनी अद्यापही लस घेतली नाही त्यांनी कोव्हिड लस घेऊन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन आपले व आपल्या शहरवासीयांचे रक्षण करावे आणि शहरातील सर्व नागरिकांचे  १०० % कोव्हिड लसीकरण होणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी केले आहे. 

 या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, यांचेसह सर्व नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सर्व स्वच्छता निरिक्षक उपस्थित होते.


   

Post a Comment

Previous Post Next Post