निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सहा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांवर गुन्हा दाखल

 शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये उडाली मोठी खळबळ


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने  दिलेल्या सुचनेनुसार छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठी अनंत दांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज शनिवारी सहा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

इचलकरंजी विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार १ नोव्हेंबर ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून संतोष सोलगे ,रेश्मा सुरेकर ,अनिता मुदगल ,रेखा तोरगळे ,उज्वला वसगडे ,हेमलता डांगे अशा सहा जणांची नेमणूक करण्यात आली होती. सदरचे सर्वच अधिकारी हे नेमणूक केल्यापासून ते आजपर्यंत कामावर हजर नसल्याचे व कर्तव्यात कसूर केल्याचे तलाठी अनंत दांडेकर यांच्या निदर्शनास आले.त्यानुसार त्यांनी भारत निवडणूक आयोगाने  दिलेल्या सुचनेनुसार कर्तृत्वात कसूर केल्याप्रकरणी वरील सहा जणांविरुद्ध आज शनिवारी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान ,या घटनेने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post