प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा निमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव "या विषयावरील ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे.
प्रबोधन वाचनालयात हे ग्रंथप्रदर्शन शुक्रवार ता. २६ नोव्हेंबर ( संविधान दिन) ते गुरुवार ता. २ डिसेंबर २०२१ या काळात वाचनालयाच्या वेळेत पाहायला मिळेल. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर सर्व क्षेत्रात मोठ्या उत्साहात सुरू आहे .याचाच एक भाग म्हणून प्रबोधन वाचनालयाच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे.या ग्रंथप्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य आंदोलन,त्याचा इतिहास,त्याकाळच्या महनीय व्यक्ती यांची चरित्रे अशी निवडक पुस्तके मांडलेली आहेत.या प्रदर्शनाचे उदघाटन संविधानाच्या प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली.प्रसाद कुळकर्णी यांनी स्वागत,प्रास्ताविक व प्रस्तावना वाचन केले.यावेळी प्रबोधन वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांनी संविधान दिनाचे महत्व अधोरेखित करणारे विचार व्यक्त केले.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ( कोलकत्ता )यांच्या आवाहनानुसार आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ इचलकरंजी व परिसरातील जिज्ञासूंनी घ्यावा. तसेच वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी व त्यात स्वतः सहभाग देण्यासाठी समृद्ध बालविभागासह एकोणतीस हजाराहून अधिक ग्रंथसंख्या असलेल्या प्रबोधन वाचनालयाचे वाचक सभासदही व्हावे असेही आवाहन या वेळी करण्यात आले.यावेळी तुकाराम अपराध ,डॉ.एफ.एन.पटेल, पांडुरंग पिसे, सौदामिनी कुलकर्णी,सतीश कुलकर्णी, नंदा हालभावी, विनायक माने,अश्विनी कोळी,जनार्दन काळे,विशाल पाटील,गणेश शिंदे आदी उपस्थित होते. अन्वर पटेल यांनी आभार मानले व सूत्र संचालन केले.
'