विशेष वृत्त : आंतर भारती"दिवाळी अंक २०२१ प्रकाशन समारंभ

 'आग्रहाचे निमंत्रण :

 उद्या सायंकाळी ५.३० वजता ' शाहू स्मारक भवन..

-------------------------------------

"आंतर भारती"दिवाळी अंक २०२१ प्रकाशन समारंभ

----------------------------------------

दिवाळीअंकाचे प्रकाशन व समारंभाचे अध्यक्ष

: मा. डॉ. डी. टी.शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

प्रमुख अतिथी:मा. राहुल रेखावर ,जिल्हाधिकारी, कोल्हापूर

प्रमुख वक्ते : मा.डॉ जे एफ पाटील ,जेष्ठ अर्थतज्ञ ,कोल्हापूर.

भाष्य: मा. डॉ रणधीर शिंदे, प्रसिद्ध समीक्षक

मा.लक्ष्मीकांत देशमुख, लेखक व संपादक ( निवृत्त जिल्हाधिकारी )

दिनांक- बुधवार ता.३ नोव्हेंबर २०२१

वेळ- सायंकाळी ५.३० वाजता

स्थळ- शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर

                             विनीत

 डॉ.डी. एस. कोरे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,आंतर भारती

 प्रसाद माधव कुलकर्णी,सरचिटणीस,समाजवादी प्रबोधिनी

-------------------------------------

"आंतर भारती"ही अखिल भारतीय स्वरूपाची संस्थाअसून ती साने गुरुजींच्या विचारधारेप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता, भाषा भगिनी प्रेम आणि सांस्कृतिक अभिसरणासाठीकामकरते.   संवाद आणि प्रबोधन याद्वारे हे काम पन्नास वर्षांपासून निरंतर चालू आहे.याचाच एक भाग आंतर भारती पुणे द्वारा गेली तीन वर्षे पुर्णतः वैचारिक स्वरूपाचा प्रबोधनपर दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. त्याचे संपादक  प्रसिद्ध लेखक, माजी जिल्हाधिकारी व अ.भा.मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आहेत.या वर्षीचा आंतर भारतीचा दिवाळी अंक "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय"विशेषांक आहे. आज देशातील चिंताजनक परिस्थिती पाहता हा विषय सामान्य जनासाठी अत्यंत  महत्वाचा व जिव्हाळ्याचा झाला आहे. त्या मुळे या तीन न्यायच्या  विविध पैलूंचा शोध व त्यांचा सामान्य माणसाच्या जगण्याशी कसा संबंध आहे , हे उलगडून दाखविणे हा या अंकाचा विषय आहे. या अंकाचा प्रकाशन समारंभ आंतर भारती आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजित केला आहे.

     भारतीय संविधानाच्या सारनाम्यात प्रत्येक भारतीय नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय देण्याचे अभिवचन दिले आहे. स्वातंत्र्याच्या  सुवर्णमहोत्सवी वर्षात  सर्वसामान्य भारतीयांना हे तिन्ही न्याय खऱ्या अर्थाने मिळाले का? रोगगाराच्या  हमीसह  चांगले जीवन जगण्याचा आर्थिक  न्याय मिळाला का? समतेचा अधिकार आणि संधीची समानता असणारा सामाजिक न्याय आम आदमीला किती प्रमाणात मिळाला  व त्याने दलित व वंचित समाजाची सामाजिक प्रतिष्ठा वाढली का? सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो का? त्या अर्थाने राजकीय न्याय लोकांना आज  मिळत आहे का? या साऱ्या मूलभूत प्रश्नांचा वेध घेणारे एक्कावन्न  लेख असणारा "आंतर भारती"चा "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा" विशेषांक आहे.  या अंकात राजकीय प्रतिनिधित्व आणि आरक्षण असा एक महत्वाच्या विषयाचा परिसंवाद आहे. काँग्रेस, भाजप आणि कम्युनिस्ट पक्षांची सामाजिक व आर्थिक न्यायाची धोरणे काय आहेत याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉ भालचंद्र कांगो यांनी लिहिले आहे, ते या अंकाचे खास आकर्षण आहे. 

अशा या वैचारिक प्रबोधनपर साहित्य असणाऱ्या "आंतर भारती"च "सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय" या  दिवाळी अंकाचे प्रकाशन   कोल्हापुरात  शाहू स्मारक भवनात  बुधवार ता. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता  शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.डी. टी .शिर्के यांच्या शुभहस्ते आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या  प्रसंगी जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ .पाटील , प्रसिद्ध समीक्षक डॉ रणधीर शिंदे आणि अंकाचे  संपादक  लक्ष्मीकांत देशमुख हे प्रमुख वक्ते असतील.

  तरी कोल्हापुरकर रसिकांनी दिवाळी पूर्वी वैचारिक फराळाचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन कार्यक्रमाचे आयोजक आंतर भारतीचे कार्याध्यक्ष  डॉ. डी .एस .कोरे  आणि समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी  यांनी  केले आहे.

-–-----------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post