प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :
देहूरोड येथे वॉक करणा-या महिलेच्या , गळ्यातील सोन्याची साखळी दागिने चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. याप्रकरणी गुरुवारी दि.१८ संबंधित पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. गुरुवारी दि. १८ सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला देहूरोड येथील इंद्रपूरम सोसायटी बँक ऑफ इंडियाच्या जवळ मॉर्निंग वॉक करत होती. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी महिलेच्या गळ्यातील 30 हजारांची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिस्काऊन नेली.
या बाबत चिखली पोलीस ठाण्यात २३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. गुरुवारी दि. १८ रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला अकुर्डी चिखली रोड ने चालत जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून चोरून पळाले.असल्या घटणे मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहे.