बनावट खव्याची निर्मिती करून विक्री , कारखान्यावर छापा

भरमसाठ हप्त्यामूळे या कडे दुर्लक्ष 

लोकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा ..मागणी

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 गेल्या दोन-तीन वर्षापासून केज पासून जवळच असलेल्या ऊमरी शिवारात व्हर्टीकल फुड्स राधाकृष्ण कंपनी बनावट खव्याची निर्मिती करून विक्री करत होती. याची संपूर्ण माहिती अन्नभेसळ विभागाला देखील होती. परंतु अधिकाऱ्यांना मिळत असलेल्या भरमसाठ हप्त्यामूळे या कडे दुर्लक्ष केले गेले. शेवटी पापाचा घडा भरल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी कंपनीवर छापा मारून 5 लाख 37 हजार 480 रुपयांचा तब्बल 2958 किलो खाद्यपदार्थ जप्त केले.
गेल्या अनेक दिवसांपासून केज — बीड रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्या समोर उंमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी नकली खवा तयार करून हैदराबाद मुंबईच्या बाजारपेठेत विक्री करत होती. दररोज चार ते पाच वाजण्याच्या सुमारास हा नकली खवा टेम्पोतून घेऊन जाण्यात येत असे. या नकली खव्या सोबतच व्यापाऱ्यांचा खवा देखील याच टेम्पो मधून हैदराबादला जात असे. या कंपनीचे मालक धनंजय महादेव चोरे ( रा. जिवाचीवाडी केज हल्ली मुक्काम उमरी शिवार ) या धंद्याची सर्व माहिती केज पोलिसां सोबतच अन्नभेसळ आयुक्तांना देखील होती. दर महिन्याला भलीमोठी रक्कम अन्नभेसळ विभागाचे अधिकारी हप्त्या पोटी घेऊन जात असत.
जनतेच्या आरोग्याची उघडउघड खेळ सुरू असला तरी स्वतःची तुंबडी भरण्यातच अन्नभेसळ चे अधिकारी मश्गुल होते. यासर्व धंद्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी त्यांनी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी व त्यांच्या पथकाला बोलावून घेत दोन पंचासह रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कारखान्यावर छापा मारला

.या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या दुधाच्या पावडर मध्ये रूची तेल मिक्स करून खवा तयार करत असल्याचं निदर्शनास आलं. नकली खव्याचे पदार्थ संशयित वाटल्यामुळे त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. यावेळी पाच लाख 37 हजार 480 रुपयांचे 2958 किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.याबरोबरच ही कंपनी पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आली आहे. या कार्यवाहीत सहा. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह अन्न औषध प्रशासनाचे सहा.आयूक्त सय्यद इम्रान हाश्मी, तन्मडवार,मूख्तार, पोलीस उपनिरीक्षक मारुती माने, हे.काॅ. बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर पो.ना. रामहरी भंडाने, राजू वंजारे सचिन अहंकारे, संतोष राठोड सहभागी झाले होते. आतातरी अन्न औषध प्रशासनाने जागे होऊन लोकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी होऊ लागली आहे


Post a Comment

Previous Post Next Post