राजकिय भूकंप : उल्हासनगरमध्ये राजकीय उलथापालथ


भाजपला मोठा धक्‍का  , 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला .


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  सुनिल पाटील : 

 ठाणे - उल्हासनगरमध्ये राजकीय उलथापालथ झाली असून भाजपला मोठा धक्‍का बसला आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.त्यानंतर कलानीसह 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

हा पक्षप्रवेश मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात पार पडला. पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

यानंतर कलानी गटाच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. यामुळे उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात पक्षाला बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे. मागील निवडणुकीत हे 22 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

पप्पू कलानी कारागृहातून बाहेर आल्या नंतर उल्हासनगरातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती.

Post a Comment

Previous Post Next Post