प्रेस मीडिया वृत्तसेवा :
शिरोळ /प्रतिनिधी:
शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिरोळ तालुका हा क्रांती करण्यासाठी नेहमीच पुढे असतो, पूर्वीचीच रग लोकांच्यात आहे याची जाण ठेवून या सन्मानाला ठेच लावण्याची भूमिका जर वरिष्ठ पातळीवर घेतली गेली तर शिरोळ तालुक्यातील जनता त्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्वसंमतीने गणपतराव पाटील यांच्या रूपाने उमेदवार दिला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे राहूया आणि तालुक्यात नव्या विकासाला सुरुवात करूया, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. जिल्हा बँकेसाठी गणपतराव पाटील यांची निवड बिनविरोध व्हावी असा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुका सर्वपक्षीय समितीच्यावतीने गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ ठरावधारक आणि कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, मातीशी नाळ असणारा नेता शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम करत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. पुरोगामी तालुक्यात क्रांती घडून राजकारणाला कलाटणी मिळेल.
दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी म्हणून मी जिल्हा बँकेची निवडणूक लढवीत आहे. क्षारपड मुक्त जमीन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा बँक आणि नाबार्डच्या योजनांची महत्वाची भूमिका असते. बँकेकडून कमी व्याजदरात पैसे उपलब्ध झाल्यास शेतकरी जमीन क्षारमुक्ती साठी पुढे येतील याची खात्री आहे. दत्त कारखान्याच्या माध्यमातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, कमी खर्चात दोनशे टनापर्यंत ऊस उत्पादन घेणे, महापूर बाधित क्षेत्रांमध्ये आंबा, चिकू, पेरू, बिट अशा नवीन पर्यायांचा विचार करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग सुरू आहेत. या सर्वांचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने आपण काम करीत आहोत. या कामाला पाठबळ मिळाल्यास शिरोळ तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या सोबत होतो, आहे आणि यापुढेही ठामपणे राहणार, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.
माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम गणपतराव पाटील यांनी केल्याचे आम्ही वरिष्ठ नेते, मंत्र्यांना सांगितले आहे. बिनविरोध साठी शिष्टाईचे काम करून आम्ही थांबलोय. आता ठरावधारकच निर्णय घेऊन गणपतराव पाटील यांना जिल्हा बँकेत पाठवतील.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती महादेव धनवडे म्हणाले, मातीशी नाळ असणारा नेता शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम करत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. पुरोगामी तालुक्यात क्रांती घडून राजकारणाला कलाटणी मिळेल. कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सावकर मादनाईक, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, शिरोळ तालुका भाजपा नेते अनिलराव यादव, जि. प. सदस्य विजय भोजे, राष्ट्रवादीचे नेते चंगेजखान पठाण, माजी उपसभापती राजू पाटील, वसंत हजारे, राम शिंदे,विजय पाटील,
ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पाटील, विनया घोरपडे, संगीता पाटील कोथळीकर, भरत बँक चेअरमन विठ्ठल मोरे, बबन हातळगे, राजगोंडा पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, काँग्रेसचे शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, दत्त ग्राहक भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, नेते गुंडूनाना दळवी, दत्त कारखान्याचे संचालक रणजित कदम, शेखर पाटील, विश्वनाथ माने, महेंद्र बागे, महादेव राजमाने, अमरसिंह निकम, सदाशिव पोपळकर, दरगू गावडे, संजय पाटील, धनाजी पाटील नरदेकर, अशोकराव कोळेकर, रमेश पाटील, संजय पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक योगेश पुजारी,
विठ्ठल पाटील, शैलेश आडके, वृषभ पाटील यांच्यासह शिरोळ तालुक्यातील ठरावधारक, विविध पक्षांचे पदाधिकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते. आभार भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी मानले.