केंद्रीय पथकाने केली कुरुंदवाड व नृसिंवाडी परिसरातील नुकसानीची पाहणी.

 

प्रेस मीडिया वृत्तसेवा : ओमकार पाखरे :

    जुलै महिन्यात आलेल्या महापूरमुळे शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आणि श्री क्षेत्र नृसिंवाडी येथे झालेल्या नुकसानीची पाहणी काल, मंगळवारी केंद्रीय पथकाने केली. यावेळी येथील जिवाजे ताळ्यावर महापुरात झालेल्या पडजड घरांची पाहणी केंद्रीय पथकाने केली. तसेच महापुरात झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील कुजलेल्या पिकांची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे व पिकांचे झालेले नुकसान यासंदर्भात केंद्रीय पथकाच्या सदस्यांना सांगून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेकऱ्यांनी केली. तर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील महापुरात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावेळी येथील व्यापाऱ्यांची आणि दुकानदारांची भेट घेऊन दुकानाची पाहणी करण्यात आली. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे, अभिजित जगदाळे, देवस्थान समितीचे सदस्य अमोल पुजारी, प्रतीक धनवडे, शिवराज जाधव आदी उपस्थित होते.

          शिरोळ येथील जुना कुरुंदवाड रस्त्यावरील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केंद्रीय पथकाच्या सदस्यांकडून करण्यात आली. उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगताना गेल्या तीन वर्षांपासून आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान होत आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी . आणि महापुरामुळे पिकांची नुकसान होणे यासाठी ठोस निर्णय घेऊन धोरण ठरवावे. अशी उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या सदस्यांकडे मागणी केली. यावेळी केंद्रीय पथकाचे श्रीरविनाश कुमार, महेंद्र सहारे, पूजा जैन, देवेंद्र चापेकर यांच्यासह जिल्हाधिकारी राहुल रेखावर, प्रांताधिकरी विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे - धुमाळ, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मुख्याधिकारी निखिल जाधव, नगराध्यक्ष जयराम पाटील, मंडल अधिकारी चंद्रकांत काळगे, तलाठी श्रीमती ढेरे, कुरुंदवाड पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post