प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सांगोला तालुक्यातील देवळे येथील विठाई मिल्क ऍण्ड प्रॉडक्ट कंपनीवर अन्न व औषध प्रशासन पथकाने कारवाई करत नीळ मिश्रित दुधाचा साठा पकडला असून, परवाना रद्द करत कारवाई केली आहे.रणजित शिवाजी व्हनमाने हे सांगोला तालुक्यातील देवळे येथे भागीदारीत विठाई मिल्क ऍण्ड फूड प्रॉडक्ट कंपनी चालवितात. या कंपतीने अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली असता दुधामध्ये भेसळ करण्याकरिता लिना नीळचे (अपमिश्रक) 10 बाटल्या आढळल्या.
त्याचप्रमाणे व्हे पावडर अमूल ब्रँडचे 25 बॅग मिळून आले. या नीळ व पावडरचा वापर करून गायीच्या दुधात म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग आणत असत. हे भेसळयुक्त दुधाची विक्री करत होते. सदर भेसळ करण्याचे साहित्य चैतन्य संकलन केंद्र पंढरपूर, श्री बालाजी ट्रेडर्स, जयसिंगपूर, शिरोळ, कोल्हापूर यांनीही वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी रणजित व्हनमाने व त्यांच्या पाच भागीदारांविरुद्ध कारवाई करत परवाना रद्द केला आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत व त्यांच्या पथकाने केली आहे. यावेळी 21 हजार रुपये किमतीचा भेसळ साठा जप्त करण्यात आला आहे.